‘आजच्या लढाईला मी पाठिंबा द्यायला आलो नसून तुमच्या खांद्याला खांदा लावून लढयात सहभागी व्हायला आलोय ही लढाई तुमच्या एकट्याची नाही माझ्या नेत्याने याच आंदोलनात पाठीवर लाठी खाल्ली आहे धनंजय मुंढेचा जीव गेला तरी चालेल पण तुम्हाला महाराष्ट्रात नेल्याशिवाय राहणार नाही’ असे आश्वासक उदगार महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी काढले.
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक अधिवेशन विरोधी आयोजित महा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे,मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,मालोजी अष्टेकर,मनोहर किणेकर, राजाभाऊ पाटील आदी उपस्थित होते.एकीकरण समिती निवडणूक हरली म्हणून सीमा प्रश्न संपला असे नाही ही लढाई रक्ताची आहे ही लढाई मातीची आहे या लढाईला निवडणूक म्हणून जोडणार असाल तर आणखीन लढा तीव्र करू असा देखील इशारा कर्नाटक सरकारला दिला.
तुमचं अधिवेशन बेकायदेशीर आहे तुमच्या बेकायदेशीर अधिवेशना विरोधात मराठी भाषकांचा मेळावा कायदेशीर आहे अशी कर्नाटक सरकार वर सडकून टीका करत सीमा वासीयांना सुप्रीम कोर्टात नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की हात जोडून पाया पडून विनंती करतो या लढाईत मागे हटू आत्मविश्वास कमी पडू देऊ नका-या लढाईत महाराष्ट्र सरकार विरोधी पक्ष आणि 12 कोटी जनता तुमच्या पाठीशी आहे- महाराष्ट्राच्या बेळगावात होत असलेल्या कर्नाटक अधिवेशनाचा निषेध करतो नेमही तुमच्या लढाईत सहभागी असेन असेही ते म्हणाले.
दादा पाटलांना जाण नाही हे दुर्दैव-
केवळ पाठिंबा नाही तर स्वतः लढयात उतरू -कायदेशीर रस्त्यावरील लढाई कोर्टातील आता माघार नाही.
चंद्रकांत दादा पाटील हे मुख्यमंत्र्यां नंतर महाराष्ट्राचं दुसरं मोठं खात सांभाळणारे मंत्री आहेत ते कोल्हापूरचे आहेत जवळ असल्याने त्यांनी तीव्रतेने सीमा प्रश्न मांडायची गरज होती त्यांना वेदना कळायला हव्या होत्या असा माझा समज आहे.त्यांनी गांभीर्याने समस्या जाणून घेतल्या नाहीत ते या अन्याया बाबत कर्नाटकशी बोलू शकत नसतील बैठक घेऊ शकत नसतील तर हे दुर्दैव आहे. लागलीच मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या भावना कळवू दादांनी बेळगावात येऊन बैठक घ्यावी अशी विनंती करणार असल्याचं देखील त्यांनी म्हणत चार वर्षांत उच्चाधिकार समितीची बैठक झाली नाही हे तितकंच दुर्दैव आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांना बैठक घ्या अशी देखील विनंती करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केलं
यावेळी बोलताना कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे म्हणाले कर्नाटकनी महाराष्ट्राच्या बस आठ दिवस बंद केल्या तर आम्ही कर्नाटकच्या बस पंधरा दिवस करू !भविष्यात .बेळगावल्या मराठी माणसांना खरचटलं तरी त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटतील. बेळगाव साठी आता ठराव करण्याची गरज नाही उडप्याना ठोकून काढू अस त्यांनी म्हटलं.
मुंढे यांनी कर्नाटक सरकारचा प्रोटोकॉल न घेता माध्यरात्रीच बेळगाव गाठलं होत पोलिसांचा विरोध झुगारत त्यांनी टिळकवाडी येथील मेळावा स्थळी प्रवेश केला त्यावेळी बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता.मेळावा ठिकाणी मोठा पोलीस फोउजफाट तैनात करण्यात आला होता.प्रचंड विरोध झुगारात पोलिसांच्या दडपशाहित उपस्थिती दाखवत मराठी भाषकांनी मेळावा यशस्वी करून दाखवला.