बेळगाव या सीमाभागातील मुख्य बालेकिल्ल्यात कर्नाटक सरकारचे अधिवेशन घेऊ पाहणाऱ्या कर्नाटक नेत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सीमावासीयांच्या महमेळाव्यायाची तयारी सुरू आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून मेळावा यशस्वी करण्याचे प्रयत्न समिती नेत्यांनी सुरू केले आहेत.
दरवर्षी अधिवेशनाच्या पहिला दिवशी हा महामेळावा आयोजित करण्यात येतो. यंदाही हा महामेळावा होणार असून महाराष्ट्र सरकारचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी हजर राहून पाठबळ देण्यास तयारी दाखवली असून यंदाचा महामेळावा अति भव्य स्वरूपात होणार आहे.
सीमाप्रश्न सुटेपर्यंत या भागात जैसे थे परिस्थिती ठेवा अशी मागणी असताना देखील बेळगाव जवळ हलगा येथे सुवर्ण विधानसौध बांधण्यात आले. त्यापूर्वीही खासगी जागेत अधिवेशन भरवले जात होते. त्यामुळे सांकेतिक स्वरूपात सीमावासीयांचे अधिवेशन या रूपाने हा महामेळावा भरवला जात असून त्याची तयारी सुरू आहे.