‘मराठा मंडळ हायस्कुलला 75 वर्षे आणि जिजामाता हाय स्कुलला 50 वर्षे पूर्ण झाल्याने 29 डिसेंबर पासून चव्हाट गल्ली येथील शाळेच्या पटांगणात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिजामाता शाळेचा सुवर्ण महोत्सव तर मराठा मंडळ शाळेचा अमृत महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने शाळे समोर बांधण्यात आलेल्या इमारतीचे उडघटन देखील करण्यात येणार असून या इमारतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती देखील हलगेकर यांनी दिली.