बेळगावला दुसरी राज्यधानी म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा विचार असून कायद्यात तरतूद आहे की नाही हे पहावं लागेल सदर घोषणेमुळे बेळगावचे महत्व वाढेल असे वक्तव्य गृहमंत्री जी परमेश्वर यांनी केलं आहे.
मंगळवारी सकाळी शहापूर पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीचे फीत कापून उदघाटन केल्यावर ते बोलत होते.यावेळी गृह मंत्र्यांनी नूतन इमारतीची पहाणी केली.यावेळी पोलीस महासंचालक निलमनी राजू, महापौर बसप्पा चिखलदिनी,उपमहापौर मधूश्री पुजारी,आमदार अभय पाटील पोलीस आयुक्त डॉ राजप्पा आदी उपस्थित होते.
परमेश्वर पुढे म्हणाले कि बेळगावात नवीन पोलीस आयुक्त कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव आहे पोलीस आयुकता लयासाठी नवीन अतिथी गृह बांधणार आहे.250 हुन अधिक ठिकाणी पोलीस क्वाटर्स बांधण्याचे काम प्रगती पथावर आहे. कमीत कमी गुन्हे दाखल करणारे शहापूर पोलीस स्थानक हे सगळ्या समोर उदाहरण आहे असे प्रशंस उदगार काढत अलीकडे राज्यात सध्या गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे असे त्यांनी नमूद केलं.
अंमली पदार्थ वस्तूंची तस्करी,अवैध धंदे आणि माफिया गिरी थोपवण्यात पोलिसांना यश मिळालं असून ड्रग्ज माफिया विरोधात गुंडा कायदा घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.मंत्री मंडळ विस्तार बाबत नाराजी खुशी रुसवे फुगवे असणारच असंही त्यांनी स्पष्ट केलं.