बेळगाव येथील नृत्य कलाकारांनी चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात आपली चमक दाखवली आहे.
सोळाव्या इंटरनॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड फेस्टिव्हलची सुरुवात दिनांक 13 डिसेंबर रोजी तमिळनाडू येथील चेन्नई येथे झाली आहे या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे स्वागत नृत्य बेळगाव बेळगाव येथील फिनिक्स अकॅडमी रवी शेठ (हॅरी मास्टर )व त्यांच्या संघाने सादर करून सर्वांकडून वाह वाह ही मिळविली आहे.
यावेळी अनेक फिल्म प्रोडूसर आणि डायरेक्टर कला मास्टर यांनी मास्टर रवी शेठ व त्यांच्या संघाला प्रत्यक्ष भेटून त्यांना प्रोत्साहन दिले. सात दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये देश-विदेशातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.IFFA award show या नावाने जगभरात प्रसिद्ध या कार्यक्रमांमध्ये आपल्या बेळगावच्या या एकमेव संघाला सहभाग घेण्याचा मान मिळाला यात एकूण 20 कलाकारांनी सहभाग घेतला. मास्टर रवी यांच्यासह 14 मुले व सहा मुली असे एकूण वीस नृत्य कलाकारांनी भाग घेतला.
तमिळ इंग्लिश व मराठी वाजले की बारा या गीतावर वेगवेगळ्या स्टाईल मध्ये एक आकर्षक उत्कृष्ट नृत्य व स्टंट्स सर्वांनी सादर केले.
वडगाव येथील मल्लिकार्जुन देवस्थान येथे आठ दिवसांपूर्वी या शोची प्रॅक्टिस रंगीत तालीम घेण्यात आली होती.मास्टर रवी शेठ यांनी या नृत्याची कोरिओग्राफी केली .