कर्नाटक मंत्रीमंडळातून बाजूला केले गेलेले रमेश जारकीहोळी हे आपल्या आमदरकीचाही त्याग करणार आहेत. बंगळूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी असे विधान केले असून खळबळ माजली आहे. आपली पुढील राजकीय वाटचाल तुमच्या लवकरच लक्षात येईल असे त्यांनी बोलून दाखवले आहे. ते एकटे जाणार की आणखी आठ दहा जणांना घेईन जाणार? यावर सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
पीएलडी बँक राजकारणातून डी के शिवकुमार, लक्ष्मी हेब्बाळकर आणि सरकारवर नाराज झाल्यानंतर त्यांनी असहकार पुकारला होता. या प्रकाराने नाराज होऊन त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले आता आपण खूपच नाराज झालो असून आमदारकी सोडण्याच्या तयारीत आहे असे त्यांनी बंगळूर येथे बोलून दाखवले आहे.
रमेश जारकीहोळी यांच्या प्रमाणेच नाराज लोकांचा एक गट असून त्या गटाला घेऊन ते बाहेर पडले तर सरकार कोसळू शकते. या स्थितीचा भाजपला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे रमेश यांच्या प्रत्येक कृतीवर आता कर्नाटक सरकारचे लक्ष आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मानणारे असले तरी आता प्रकरण हाताबाहेर जात असून काँग्रेस वरिष्ठांचा त्यांना बाजूला करण्याचा निर्णय सरकारला त्रासात टाकणार आहे.