Friday, January 3, 2025

/

माजी आमदारांचे अपघातात निधन

 belgaum

निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग ४ वर कणंगला क्रॉसनजीक झालेल्या अपघातात चिकोडीचे माजी आमदार दत्तू यल्लापा हक्कयागोळ (वय ७८) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.२८) दुपारी १ सुमारास झाला आहे.माजी आमदार दत्तू हुक्कयागोळ दुचाकीने चिकोडीकडे जात असताना ट्रकने जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीसह रस्त्यावर कोसळलेले हक्कयागोळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Ex mla accident death
हक्कयागोल हे चिकोडी तालुक्यातील काडापूरचे असून ते केंद्रीय पेयजल मंत्री रमेश जिगजिनगी यांचे नातलग होत. अत्यंत गरीब व सामान्य कुटुंबातील असलेले दत्तू हक्यागोल यांनी २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जुन्या चिकोडी मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. ते २००४ ते २००९ दरम्यान ते आमदार कार्यरत होते.

अलीकडेच त्यांनी चिकोडी जिल्हा न केल्यास विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या अपघाती निधनामुळे चिकोडी मतदारसंघात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या ते चिकोडी जिल्हा आंदोलन समितीचे ज्येष्ठ सदस्य म्हणून आंदोलनात सहभागी होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.