Sunday, November 17, 2024

/

‘वसाहतींनाही मिळणार मनपाच्या सुविधा’-सतीश जारकीहोळी

 belgaum

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नालेसफाई संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असे सांगितले. कुमारस्वामी लेआऊट आणि रामतीर्थनगर वसाहतीत मनपाच्या सुविधा देण्यासाठी स्वतंत्र बैठक घेणार अशी माहिती दिली आहे.

पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आज सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महानगरपालिका अधिकारी व नगरसेवकांची विशेष बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. मनपा तर्फे महापौर बसप्पा चिक्कलदींनी यांच्याहस्ते त्यांचा सत्कार झाला.


महापालिकेत नालेसफाईच्या मुद्यावरुन विशेष चर्चा झाली. नगरसेवक विनायक गुंजटकर, मोहन भांदुर्गे, मीनाक्षी चिगरे, शांता उप्पार, अनुश्री देशपांडे यांनी हा विषय प्रकर्षाने मांडला. नाला सफाईच्या बाबतीत ढिसाळ नियोजन शहरासाठी घातक ठरत आहे त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावून सांडपाणी बल्लारि नाल्याला जोडून शहरातील दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न करा अशी मागणी करण्यात आली.
शहराला २४ तास पाणी आणि २४ तास वीज योजना सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली मात्र अजून ही योजना मार्गी लागू शकली नाही.

२४ तास पाणी योजनेसाठी ६४० कोटींची गरज असल्याबाबत विशेष चर्चा होऊन हा निधी खर्च करून ४८ वॉर्डांसाठी ही योजना होऊ शकणार आहे.
देसुर येथे नवीन वीजपुरवठा केंद्र उभे करण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. अशी माहिती हेस्कोम अधिकारी अप्पांनावर यांनी दिली.

वीजपुरवठा मुबलक आहे पण पुरवठा करण्यासाठी केंद्र नाही आणि ही जागा ताब्यात मिळू न शकल्याने ही योजना रखडली आहे. असे त्यांनी सांगितले.
नगरसेवक राजू बिर्जे यांनी बैठकीची माहिती मराठीतून देण्याबरोबर शहरात मराठीसह तीन भाषेत फलक लावण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली पण यावर विशेष चर्चा न होता बैठक संपल्याची माहिती मिळाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.