समिती नेत्यांतील बेकी मुळे आणि अनेक कारणांमुळे विधानसभा निवडणुकीत एकीकरण समितीला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे मराठी जनतेत मरगळ आली होती मात्र गेल्या आठवडाभर पूर्वी सीमा प्रश्नी मुंबईत लाक्षणिक उपोषण केल्याने तरुण पिढी आणि सीमा वासीयांत एक नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. समितीतील बेकी व अश्या अनेक कारणांनी जे मराठी माणसात नैराश्य आलेलं आहे ते काही प्रमाणात युवकांच्या सक्रीयतेमुळे नैराशयेचे सावट दूर झालेलं आहे.
तरुण पिढी काही तरी करेल याची खात्री मराठी जनतेला झालेली आहे युवकांच्या माध्यमातून युवा समिती असो दबाव गट असो युवा मंच किंवा आणखी कोणती तरी युवा संघटना असो जनतेला युवकांवर ‘भरोसा’ झाला आहे.युवक संघटनांत जे युवक सक्रिय आहेत त्यांचा राजकीय स्वार्थ कमी आहे त्यापेक्षा मराठी अस्मिता आणि सीमा प्रश्न यावर अधिक भर आहे त्यामुळेच जनता युवकांना नेतृत्व द्या अशी मागणी करू लागली आहे.समिती नेत्यांनी यावर विचार करून तरुणांना काही प्रमाणात जबाबदारी देण्याची गरज आहे नेतृत्व दिल्यास युवकांना मागील इतिहासाची कल्पना येईल पुढील लढ्यासाठी कार्य करू शकतील.
सोमवारी झालेल्या मेळाव्यात धनंजय मुंढे आणि विजय देवणे या दोन्ही वक्त्यांनी बेळगावात युवकांनी लढा हाती घ्यावा अशी वक्तव्ये आपल्या भाषणातून केली आहेत.विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मुंढे यांनी या “हा लढा आता पर्यंत वरिष्ठांनी खेचून आणलेत त्यामुळं खचून जाऊ नका,निगरघट्ट आणि गेंड्याच्या कातडीला तरुणाईच्या शक्तीसमोर वाकावे लागेल,तरुण पिढीने आता पुढे यायला पाहिजे” अशी भूमिका आपल्या भाषणात मांडली तर कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे यांनी काळ्या दिनात 25 हजार युवक काळा टी शर्ट घालून रस्त्यावर उतरतात असे नेतृत्व इथे आहे युवकांना नेतृत्व देण्याची गरज मांडली होती.
वास्तविक रित्या सोमवारी झालेल्या मेळावा यशस्वी झाला प्रचंड दडपशाही झुगारत मेळाव्यास लोक उपस्थित राहिले एकेक काळी मेळावा म्हटलं की हजारोंनी जनता हजर राहायची मात्र आता ते दिवस राहिले नाहीत मात्र मुंढे यांच्या सारख्या नेत्याच्या सभेला शोभेल इतकी गर्दी होती का?का हजारांची गर्दी जमवण्यात नेते अपयशी ठरले?म्हणावी तेवढी जनजागृती झाली नाही का?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची म्हटल्यास युवकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे हा पर्याय आहे. जगात युवकांनी कोणताही लढा हाती घेतला तर तो यशस्वी होतो हा इतिहास आहे युवकांनी फ्रेंच ची राज्यक्रांती घडवली त्यामुळे जर का बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला ‘सोनेरी दिवस किंवा अच्छे दिन’ आणायचे असतील तर युवकांना नेतृत्व देणे हाच उत्तम पर्याय आहे.
अनेकदा हा प्रश्न उपस्थित झालाय मात्र समिती नेते युवकांकडे दुर्लक्षच करत आलेत आजच्या क्षणी जर का युवकांना समावून घेतलं नाही तर बेळगावातील मराठी समितीपण धोक्यात येणार यात काहीच शंका नाही यामुळे समिती नेतृत्वास कधी जाग येते हेच पहाणे औत्सुक्याचे ठरेल.