भारतीय वायू दलाची क्षमता संपूर्ण जगाने पाहिली आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रात्यक्षिक वेळी हे सिद्ध झाले आहे. पूर असोत वा इतर नैसर्गिक आपत्ती भारतीय वायू दलाने केलेली कामगिरी गौरवास्पद आहे. केरळ येथील नैसर्गिक संकटात हे वायू दलाने दाखवून दिले असून प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटला पाहिजे.असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले.
केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी सांबरा येथील वायू सेना प्रशिक्षण केंद्रास भेट दिली.त्या एक दिवसीय कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या शनिवारी दुपारी त्यांनी सांबरा येथील वायू सेना प्रशिक्षण केंद्रास भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी वायू सैनिक जवानांनी शानदार पथ संचलन करून शानदार सलामी दिली.
एअर मार्शल राकेश कुमार सिंग भदुरीया यांनी त्यांचे स्वागत केले. प्रशिक्षण प्रमुख कमांडर आर रविशंकर यांनी त्यांना एअर मन ट्रेनिंग संदर्भात माहिती देऊन त्यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी संपूर्ण पाहणी करून त्यांनी गौरव केला तसेच देशासाठी उत्कृष्ट एअर मन घडवणाऱ्या या केंद्राचे कौतुक केले. ही क्षमता कायम ठेवून धाडसी योद्धे तयार करा असे त्या म्हणाल्या यावेळी त्यांना सांबरा येथील प्रशिक्षक केंद्राची सर्व प्रशिक्षण देण्यात येणारे विभाग आदींची पहाणी केली. प्रशिक्षणार्थी जवानांनी चित्तथरारक कसरती सादर करून शाब्बासकी मिळवली.