गोगटे सर्कल रेल्वे उड्डाण पुलाच्या उदघाटन कार्यक्रमात भाजपच्या दोन्ही खासदार द्वयीत जोरदार कलगीतुरा रंगला होता.राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी आपलं नाव आमंत्रण पत्रिकेत घातलं नाही म्हणून भाजप खासदार सुरेश अंगडी यांना चांगलेच धारेवर धरले दोघांत बराच वेळ कलगीतुरा रंगला होता त्यामुळे उदघाटन कार्यक्रमाचे गांभीर्यच हरवलं होते.
असा घडला प्रसंग …
उदघाटन कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत नाव न घातल्याने नाराज झालेले राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे व्यासपीठावर यायला तयार नव्हते पोलीस अधिकारी कोरे यांना व्यासपीठावर यायला विनंती करत होते त्यावेळी खासदार सुरेश अंगडी यांनी जाहीरपणे कोरे यांची क्लास घेतली. ‘तुम्ही एवढे सिनियर आहात जास्त बोलू नका मला पण बोलता येते तुम्हाला कॉमन सेन्स नाही का’?असा उलट प्रश्न केला.
त्यावर कोरे यांनी समाधानाने उत्तर देत ‘तुम्ही दादागिरी करू नका,मी नावासाठी काहीही केलेलं नाही, मी राज्य सभा सदस्य आहे माझं का नाव आमंत्रण पत्रिकेत का नाही हे रेल्वे खात्याला विचारतोय, तुम्ही तुमच्यावर ओढवून घेऊन नका तुम्ही जावा उदघाटन करा’
असे ते म्हणाले. या दोघांचा चाललेला वाद नूतन पालकमंत्री अगदी निरीक्षून पहात होते मात्र कोणतीच प्रतिक्रिया न देता ते गप्प होते
कोरे हे राज्यसभा सदस्य असल्याने त्यांचं नाव रेल्वे उड्डाण पूल उदघाटन आमंत्रण पत्रिकेत असणे गरजेचे आहे मात्र खासदार अंगडी यांनी उदघाटनाची घोषणा दोनदा करून तारीख टळली होती ही तारीख न चुकवण्यासाठी गडगडबडीत कोरे यांचं नाव राहून गेलं होतं.रेल्वे अधिकारी खासदार अंगडी यांचे ऐकूनच कोरे यांचे नाव गाळाले की काय?ऐन निवडणूक तोंडावर असताना आपल्याच पक्षातील राज्यसभा सदस्याचा वाकडेपणा त्यांनी का घेतलाय यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या पंधरा वर्षात काहीच मोठं काम करता न आल्याने गोगटे सर्कल चे उड्डाण पूल चौदा कोटीं खर्चून तयार झालंय त्याचे श्रेय घेण्यासाठी आटापिटा चालवलेल्या खासदाराने आपल्याच पक्षातील खासदाराशी वाद ओढवून घेतला आहे.त्यामुळं पुन्हा एकदा भाजपच्या दोन्ही खासदारां मधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.