नव्या पद्धतीचे सहजपणे चोरता येतील असे कचराकुंड मनपा बसवत आहे. यापूर्वी बसवलेले स्टीलचे लटकते कुंड चोरीला गेले आहेत. आता आणखी ९७ नवीन कुंड बसवले जाणार आहेत. नागरिकांच्या कराचा पैसा असा वाया जात असताना नगरसेवक शांत कसे काय? की मिलीभगत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
१९ लाख रुपये खर्च करून असे १५२ कुंड बसवण्यात आले होते. पण त्यापैकी एक सुद्धा दिसत नाही सगळेच्या सगळे गायब झाले ही वस्तुस्थिती असताना आता मनपाने पून्हा निविदा काढली आहे. १८ लाख ९१ हजार ५०० रुपयांची ही निविदा असून प्रत्येक कुंडाची किंमत साधारणपणे ७ हजारच्या घरात आहे.
५० लिटर कचरा सामावून घेण्याची क्षमता असलेले हे कुंड लटकते आणि सहज चोरीला जाण्याच्या क्षमतेचे असतील. मायबाप नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनो कशाला नागरिकांच्या पैशाची वाट लावता. जमिनीत भक्कम राहणारे आणि चोरीला जाऊ न शकणारे कुंड बसवा. हीच गरज आहे. त्यातूनही कमिशन मिळेल आणि नुकसान सुद्धा होणार नाही.