संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नाताळ साजरा करण्यासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत.२४ तारखेच्या मध्यरात्री पासूनच नाताळच्या सेलिब्रेशनला प्रारंभ होणार आहे.
येशूच्या स्वागतासाठी घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकाश कंदील देखील लक्ष वेधून घेत आहेत.गोडधोड , मिठाई करण्यासाठी ख्रिस्ती बांधव गुंतले आहेत.चर्च,दुकाने,व्यापारी आस्थापने देखील नाताळसाठी सज्ज झाले आहेत.
विशेषतः कॅम्प भागात चर्च,शाळांमध्ये येशू जन्माचे देखावे उभारण्यात आले आहेत.
बेकरीमध्ये देखील नाताळ निमित्त विविध प्रकारचे केक तयार करण्यात येत आहेत.पण प्लम केकला अधिक मागणी असल्याची माहिती बेकरीच्या मालकांनी सांगितले.
बेळगाव डायोसिसचे प्रशासक फादर युसेबीओ फर्नांडिस यांनी नाताळच्या निमित्ताने संदेश दिला आहे.’नाताळचा सण शांती आणि आनंदाचा संदेश देतो.जगात जेव्हा मूल जन्माला येते तो क्षण आमच्यासाठी नाताळच असतो.
अनाथ,भिक्षुक,अडचणीत असलेल्या व्यक्ती आणि गरीब हे आमचे बंधू आणि भगिनी आहेत असेच आम्ही मानतो अन त्यांना मदत करतो.येशूचा जन्म म्हणजे शांती आणि आनंदाचा सण आहे.संपूर्ण मानवजातीत शांतता आणि सौहार्द घेऊनच नाताळाचा सण आला आहे असा संदेश फर्नांडिस यांनी दिला आहे