सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्याची सुनावणी येत्या आठवड्याभरात कधीही होण्याची शक्यता आहे. दावा बोर्डावर आला असून रोस्टर पद्धतीने तो या आठवड्यात सुनावणीस येऊ शकेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
न्यायमूर्ती अर्जुन सक्री, न्या.अशोक भान आणि न्या.अब्दुल नजीर या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी व्हायची शक्यता आहे.वरील तिघेही न्यायाधीश हजर राहिल्यास ही सुनावणी होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.
युवा समिती मोर्चा आणि महाराष्ट्र सरकारचे आश्वासन याने वातावरण पुन्हा चर्चेला आलेले असताना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील कामकाजही लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसून आल्याने समाधानाची बातमी आहे.
सुनावणी लवकर होऊन कामकाज मार्गी लागल्यास निकाल वेळेत मिळणे शक्य होईल.आगामी दहा तारखे पासून कर्नाटक विधी मंडळाचं बेळगावात होणारे अधिवेशन,त्या विरोधात समितीचा महा मेळावा ,नुकताच मुंबईतील आझाद मैदानावर युवा समितीच्या वतीने यशस्वी झालेलं लाक्षणिक उपोषण आणि आता या आठवड्यात सुप्रीम कोर्टाची होणारी संभाव्य तारीख या सर्व घडामोडी मुळे पुन्हा एकदा बेळगाव सीमा प्रश्न चर्चेत असणार आहे.