स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी जोरात असताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बेळगावला कर्नाटकाची दुसरी राजधानी बनवण्यात येईल असे जाहीर केले होते.पण कायद्याच्या बाजूने विचार केला असता हे अशक्य असल्याचे आता सरकारच्याच लक्षात आले आहे.
अधिकृतपणे असे करणे अवघड आहे. भारतीय राज्यघटनेत तशी तरतूद नाही. कायद्याचे सल्लागार सुद्धा हेच सांगत असल्याने कर्नाटक सरकार अधिकृतपणे असे विधेयक पारित करू शकत नाही.
यामुळे आता असे विधेयक न करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. विधानसभेत फक्त चर्चा करून बेळगावला दुसरी किंव्हा उपराजधानी मानून काही कार्यालये बंगळूर हुन बेळगावच्या सुवर्ण विधानसौध मध्ये हलविली जाणार आहेत.