उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या विमानतळास कित्तुर राणी चन्नम्मा यांचे नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामीं यांनी तशी माहिती दिली आहे.
कर्नाटक सरकार केंद्रीय हवाई उड्डाण खात्याकडे आणखी एक प्रस्ताव पाठवून सांबरा विमानतळास कित्तूर राणी चन्नाम्मा यांचे नाव देण्यासाठी मागणी करणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानपरिषदेत उत्तर देताना ही आज माहिती दिली.
भाजपचे विधानपरिषद सदस्य महानतेश कवटगिमठ यांनी नामकरण बद्दल सरकार काय करत आहे असा प्रश्न विचारला होता.याआधी एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आता आणखी एक प्रस्ताव पाठवला जाईल असे कुमारस्वामी यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक मोठ्या शहरातील विमान तळास थोर महापुरुषांची नावे आहेतअसेच नाव आता बेळगावातील विमान तळास दिले जाणार आहे.मुंबई-छत्रपती शिवाजी महाराज विमान तळ,दिल्ली-इंदिरागांधी विमानतळ, कोलकाता नेताजी सुभाष चंद्र बोस विमान तळ,बंगळुरु केम्पे गौडा विमान तळ, आदी