परराष्ट्र मंत्रालयाने चिकोडी येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे. जानेवारी महिन्यात हे केंद्र सुरू होणार आहे. सध्या चिकोडी आणि परिसरातील नागरिकांना पासपोर्टसाठी बेळगावला यावे लागते.
चिकोडी मुख्य पोस्ट कार्यालयाचे सुपरिटेनडेंट आर एम घोरपडे यांनी आपल्याला एक पत्र आले असून त्यामधून पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे.आमच्याकडे जागा आहे. असे सांगितले आहे. उर्वरित तयारी अजून व्हायची असून ती लवकरच होईल असेही त्यांनी कळवले आहे.
बेळगाव शहराचे पास पोर्ट केंद्र सुरू करण्यासाठी विदेश मंत्रालयाचे अधिकारी ज्ञानेश्वर मुळ्ये यांनीं प्रयत्न केले होते त्याच वेळी खासदार प्रकाश हुक्केरी यांना मुळे यांनी चिकोडीत देखील पासपोर्ट कार्यालय सुरू करू असे आश्वासन दिले होते त्या नुसार खासदार हुक्केरी आणि मुळे यांच्या प्रयत्नातुन चिकोडीत देखील ही सेवा प्रारंभ होत आहे.