अनगोळ आणि परिसरात सलग दोन रात्री निर्माण झालेल्या तणावाला निष्क्रिय सीपीआय कारणीभूत ठरत आहेत. संपूर्ण भागात पोलिसांचा वचक कमी झाला असून अश्या राजकीय वजन वापरून जागा अडवून ठेवलेल्या सीपीआय ला हटवण्याची मागणी सामान्य नागरिक करत आहेत.
शुक्रवारी रात्री झालेल्या क्षुल्लक भांडणातून अनगोळ भागात तुफान दगडफेक झाली आणि यात वाहनांचे तोडफोड व नुकसान करण्यात आले. पोलीस नेहमी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे उशिरा पोचले. तसेच या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात सीपीआय ना अपयश आल्याने एसीपी एन व्ही भरमनी व महांतेश्वर जिद्दी या अधिकाऱ्यांना लक्ष घालावे लागले.
अनगोळ भागात नेहमीच अशा तणावाच्या घटना घडत असून टिळकवाडी पोलीस स्थानकावर नेमलेल्या निष्क्रिय सीपीआय च्या बेजबाबदार कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे.
प्रत्येक पोलीस स्थानक हद्दीत सीपीआयवर जबाबदारी असते. कोणत्याही भागात काहीही झाले तर त्या मागे काय कारण आहे हे चटकन त्या अधिकाऱ्याला कळणे आवश्यक असते. पण टिळकवाडी पोलीस स्थानक या बाबतीत कमी पडत असून याकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.