Friday, November 15, 2024

/

अंजलीताईंचा मराठी कागदपत्रांसाठी आवाज!

 belgaum

खानापूर येथील काँग्रेस आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील मराठी जनतेला ज्याप्रमाणे निवडणूक आयोग मराठीतून माहिती देतो त्याचप्रमाणे सर्व सरकारी कागदपत्रे मराठीत मिळावीत यासाठी कर्नाटक विधानसभेत आवाज उठवला आहे. मराठी लोकांचे प्रतिनिधित्व करताना केलेल्या या मागणीने कर्नाटकी सरकारसमोर योग्य बाजू मांडल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

अंजलीताई यांनी सभागृहात आपण हा प्रश्न मांडणार असल्याची माहिती माध्यमांना दिली त्यामुळे या मुद्द्यावर कर्नाटक विधान सभेत चर्चा होणार आहे मराठीची चर्चा होणार असल्याने कानडी संघटनांचा तीळ पापड झाला असून त्यांनी अंजलीताई यांना लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे मराठी मतांवर निवडून आलेल्या इतर  बेळगावातील मराठी भाषिक आमदार काय करतात हे देखील पहाणे गरजेचे आहे त्यांची मराठी निष्ठा यातून कळणार आहे.

कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी आपण स्वतःच हिंदीत बोलू का असा प्रश्न सभाध्यक्ष रमेशकुमार यांना विचारला होता. यावरून काँग्रेस पक्षाच्या आमदाराला कन्नड येत नाही काय असा प्रश्न उपास्थित झाला होता. आता अंजलीताई या सुद्धा काँग्रेस मधील आहेत. त्यांनीही मराठी माणसाची बाजू मांडली असल्याने त्याची चर्चा सुरू आहे.

Anjali mla

खानापूर मतदारसंघात मराठी लोकांची संख्या जास्त आहे. ही माणसे मराठीत कागदपत्रे मिळावीत अशी मागणी कायम करत असूनही त्यांना न्याय मिळाला नाही. यापूर्वी समिती आमदार हीच मागणी करत होते पण त्या मागणीला योग्य स्थान मिळाले नाही. आता कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी असलेल्या अंजलीताई यांनीच ही मागणी केल्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेईल याकडे लक्ष आहे.

काही कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी याला विरोध केला आहे. कर्नाटकात कन्नड धोरण राबवणे हे काँग्रेसचे काम असून काँग्रेसच्या आमदार मराठी धोरणाला पाठींबा कशा देतात असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांना पत्र दिले आहे. तसेच तुमच्या आमदारांना समज द्या अशी मागणी केली आहे. विरोध जितका होईल तितका मतदारसंघात अंजलीताईंचे स्थान बळकट होत असून काँग्रेस मध्ये असून त्या आपल्या हक्कांसाठी लढत आहेत अशी भावना मराठी लोकांत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.