कर्नाटक विधानसभा आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाचा उत्तरार्ध आज पासून सुरू होत आहे. आंदोलने आणि आरोपांच्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होत असल्याने हा उत्तरार्ध वादळी ठरण्याची शक्यता आहे.
मागील सोमवारी अधिवेशन सुरू झाले आणि शुक्रवार पर्यंत चालले. शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या झाल्यानंतर आता अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
उद्या सकाळी कामगार संघटनांचे आंदोलन सर्वात मोठे होणार आहे. हे आंदोलन सरकार ला दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धडक देणार असून याचबरोबर इतर अनेक आंदोलने होतील.
भाजप या प्रबळ विरोधी पक्षानेही समस्या सोडवू न शकणारे सरकार खुर्च्या खाली कराव्यात अशी मागणी केल्याने अनेक प्रकारच्या समस्या सहन कराव्या लागणार आहेत.