केंद्रीय भाजप सध्या धास्तावले आहे. ज्या राज्यात जिंकण्याची अपेक्षा होती तिथेच काँग्रेसने धूळ चारल्यामुळे आता पुढे काय करायचे हा प्रश्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आहे.मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये अँटी इंकंपन्सी मुुुळे भाजपला फटका बसलाय त्यामुळं भाजप केंद्रीय नेतृत्व बिथरले आहे तेंव्हा निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढून पुढील लोकसभा जिंकण्यासाठी कुचकामी व्यक्तींचा चेहरा बदलावा लागणार आहे . या अँटी इंकंपन्सीमध्ये बेळगाव लोकसभा मतदारसंघही याला अपवाद नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोदी लाटेत संधी मिळाली पण त्या संधीचे सोने करून घेणे स्थानिक नेत्यांना जमलेले नाही. याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मोदी वगळता इतर ठिकाणी झिरो असे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे सगळीकडे प्रमाणापेक्षा जास्त हार सहन करावी लागली असून याचा फटका भरून काढण्यासाठी आता नवीन चेहरे लोकसभेसाठी बाहेर काढून जनतेला आणि कार्यकर्त्यांना ही विश्वासात घेण्याची वेळ भाजपला आली आहे तशी इतर कडून बोलले जात आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुरेश अंगडी हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पुढे जात नाहीत असा आरोप याआधी सुद्धा झाला आहे. सध्या तर कार्यकर्ते नाराज आहेत. याशिवाय मतदारांवरही छाप पाडता आलेली नसल्याने आता यावेळी अंगडी यांना बाजूला करून नवीन चेहरा द्या अशी मागणी वाढली आहे. याची दखल पक्ष नेतृत्वाना घ्यावी लागणार आहे. भाजपचा तीन राज्यातील पराभव विध्यमान खासदारांच्या विरोधात जाणारा आहे. खासदारकी साठी प्रयत्न करणारे माजी आमदार संजय पाटील,शंकर गौडा पाटील आणि विश्वनाथ पाटील यांना भाजप हाय कमांड अँटी इंकंपन्सी मुुळे उमेदवारी मिळवण्यासाठी बळ मिळालं असून त्यानी आपली लॉबी वाढवायला सुरुवात केली आहे.
सध्या भाजपमध्ये अनेक नवे चेहरे पुढे आले आहेत. कार्यकर्त्यांना हाताशी धरून पुढे जाण्याची क्षमता असलेले नेते स्वतःहून आपल्याला प्रोजेक्ट करत आहेत. याचा विचार नेतृत्वाने केल्यास तसेच काम करणारे उमेदवार तसेच ठेऊन कुचकामी लोकांना बाजूला फेकल्यास लोकसभेत निभाव लागणार आहे. अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमधूनच ऐकायला येत आहे.