काँग्रेस पक्षातील नाराज गटाकडून जेडीएस आणि काँग्रेस अशा कर्नाटकातील संयुक्त सरकारवर अजूनही अपयशाची टांगती तलवार कायम आहे. उत्तर भारतातील राज्यात अपयश आलेले उट्टे काढण्यासाठी आता भाजप कर्नाटकात हादरे देण्याची शक्यता मोठी आहे.
मंत्रिपद व इतर कारणांमुळे काँग्रेस व जेडीएस मधील काही आमदार नाराज आहे. काँग्रेस च्या आमदारांचा एक मोठा गट आता भाजपच्या संपर्कात आहे हे उघडच झाले आहे त्यामुळे सरकार केंव्हापर्यंत वाचेल हे सांगणे कठीण आहे. भाजपने हादरा देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांची मदत घेण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे.
जेडीएस आणि काँग्रेस संयुक्त सरकार करताना काँग्रेसने आपली पडती बाजू ओळखून मुख्यमंत्री पदाची माळ जेडीएस कडे दिली पण आत्ता त्यांचे स्थानही वाढले असून काँग्रेस नेतृत्व अधिकार आपल्याकडे येण्याची मागणी करू शकते याचा फटकाही सरकारच्या अस्तित्वावर बसणार असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.