Monday, November 25, 2024

/

बांधकाम व मनरेगा कामगार धडकणार सुवर्णसौध वर

 belgaum

अधिवेशन सुरू झाल्यापासून सुवर्णसौध वर आंदोलनांचा पाऊस पडत आहे. शेतकरी आणि इतर आंदोलकांबरोबरच आता बांधकाम कामगार आणि मनरेगा कामगारसुद्धा सुवर्णसौध वर धडकणार आहेत. दि १८ रोजी त्यांचे हे आंदोलन होणार असून कर्नाटक सरकारला हा मोठा हादरा असेल.

बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार आणि मनरेगा कामगार संघटनेचे अध्यक्ष एन आर लातूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून यात हजारो कामगार सहभागी होत आहेत.

या आंदोलनाची जागृती सुरू आहे. प्रत्येक गावात बैठकी घेऊन तयारी सुरू करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देणे आणी मनरेगा कामगारांना भ्रष्टचार रोखून न्याय देणे हे या आंदोलनाचे उद्दिष्ट आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.