जि पं सदस्य सरस्वती पाटील यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आर एफ ओ कडोलकर याने पुन्हा एकदा त्यांना फोन करून कन्नड आणि मराठी भाषिकांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी बोलणे कर्नाटकात चालणार नाही असे सांगून मराठी लोकप्रतिनिधी महिलेच्या लोकशाहीने दिलेल्या हक्कांवर गदा आणली असून आपण हिंदी बोलत नाही असे सांगून राष्ट्रभाषेचाही अपमान केला आहे. या कृतीने सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे.
मला कन्नड येत नाही. माझे शिक्षण मराठीत झाले आहे कृपया हिंदीत बोला अशी मागणी केल्यावरून आर एफ ओ ने राजकारण सुरू केले आहे. हिंदी येत नसेल तर देश सोडून जा असे सरस्वती पाटील यांनी बोलल्यावरून चिडलेल्या आर एफ ओ ने आज पुन्हा फोन करून आपल्याशी गैरवर्तन केले आहे असे सरस्वती पाटील यांनी सांगितले आहे.
फोन वर एक लोकप्रतिनिधी असलेल्या महिलेशी कसे बोलावे याचे भान सुद्धा आर एफ ओ बाळगत नसून त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सरस्वती पाटील यांनी केली आहे.
कन्नड ही लोकल भाषा आहे असे सांगून त्या अधिकाऱ्याने आपल्या भाषिक अल्पसंख्यांक म्हणून लोकशाहीने दिलेल्या अधिकारांवर गदा आणली आहे याचा तीव्र निषेध आपण करतो असे सरस्वती पाटील म्हणाल्या.