Thursday, May 2, 2024

/

‘त्यांची नजर पडली अन एक जीव वाचला’

 belgaum

भटकी कुत्री त्याच्या पाठीमागे लागली होती. तो जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत होता. चार ते पाच कुत्री त्याचा फडशा पडणार असे असतानाच एका गवंडी कामगारांची त्या घटनेकडे नजर गेली अन त्याचा जीव वाचला. ही घटना शनिवारी सकाळी आठच्याविनायक नगर येथे घडली.

विनायकनगर परिसरात एक मोर आला असता काही भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी मोर आपला जीव वाचविण्यासाठी त्या परिसरातील भागात धावत होता. मात्र कुत्री त्याचा फडशा पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती.

Peacock

 belgaum

त्या मोराचा फडशा पडणार इतक्यात जवळच असणाऱ्या एका गवंडी कामगाराने त्या मोराचा जीव वाचविला.विनायकनगर येथे ही घटना घडली आहे. मोरावर हलला करणार इतक्यात त्या गवंडी कामगाराने त्या कुत्र्यांना हुसकावून लावले आणि मोराला वन खात्याच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे त्या मोराला जीवदान मिळाले आहे.

यावेळी गवंडी कामगार सचिन खडली रा.मुचंडी,आकाश जाधव रा. कडोली आणि मल्लाप्पा मायाना रा. कडोली या तिन्ही युवकांनी मोराला जीवनदान दिले. हे सगळे युवक विनायक नगर येथे एका बंगल्यात गवंडी कामाला आले होते सकाळी काम सुरू करताना त्यांची नजर या मोरावर पडली आणि त्यांनी राष्ट्रीय पक्षास जीवनदान देण्याचं काम केलं.
बेळगाव रेंजर श्रीनाथ कडोलकर सहकारी विनय गौडर, रमेश गिऱ्यापनांवर,एस ए मगदूम मोहम्मद किल्लेदार यांनी त्या मोरास काकती जंगलात सोडून दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.