पहिली वाहिली स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगड किल्ल्याचा इतिहास मोठा रंजक ठरतो. चढण्यासाठी मोठा कठीण हा गड आजही त्याच वैभवशाली इतिहासाची साक्ष देतो. त्यामुळे अनेकांना या गडाची आवड असतेच. त्यामुळे हा गड बनवण्यासाठी बेळगाव आणि परिसरात अनेकांनी हा गड बनविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
शहराबरोबरच ग्रामीण भागातही राजगडाची प्रतिकृत्या उभारण्यात आल्या आहेत. कंग्राळी बुद्रुक येथील रौद्र शंभू ग्रुप मराठा कॉलनी येथील मुलांनी हा गड तयार केला आहे. हा गड किल्ला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
या गडाचे पूजन वकील सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करून उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या गडाची माहिती मुलांना करून दिली आणि यापुढेही असेच गड तयार करण्याचे प्रोत्साहन दिले. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचेही पूजन करण्यात आले. मागील 15 ते 20 दिवसापासून मुलांनी हा गड बनविण्यासाठी प्रयत्न घेतले आहेत.
रौद्र शंभू ग्रुप बी के कंग्राळी चे ओंमकार मेलगे, सूरज गौतम, अविनाश कोळी, सुधीर पाटील, कुणाल अष्टेकर, प्रथमेश चव्हाण, धनराज चव्हाण, संस्कार गुरव, काळगेकर यांच्यासह परिसरातील मुलांनी परिश्रम घेतले आहेत.तबाबल आठ ते दहा दिवस अथक परिश्रम घेऊन या बाल चमुनीं हा किल्ला साकारला आहे.