Friday, January 10, 2025

/

 ‘जयघोष करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यास युवा समितीचा दणका’

 belgaum

पोवाडा म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणाऱ्या विद्यार्थ्यांला मारहाण करणाऱ्या शिक्षकास युवा समितीने दणका दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
भरतेश हायस्कुल मधील शिक्षकाने बाल दिनाच्या कार्यक्रमात पोवाड्यानंतर जयघोष केल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केली होती सदर घटनेची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी शुक्रवारी शाळेत जाऊन शिक्षक व मुख्याद्यापकाला जाब विचारत धारेवर धरले.
पोवाडा म्हटल्यावर जयघोष होणे साहजिकच असते त्यामुळे बाल दिनी शाळेत कार्यक्रमात एक मुलीने पोवाडा म्हटला पोवाडा संपताच विद्यार्थ्यांने छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता,हिंदू धर्माचा जयघोष करणाऱ्या घोषणा दिल्या मात्र मराठी संस्कृती द्वेष्ट्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांस खोलीत डांबून मारहाण केली होती ही सगळी घटना सदर विद्यार्थ्याने युवा समितीच्या कार्यकर्त्यांना दिली त्यानुसार युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन जाब विचारला त्यामुळे अनेक शिक्षक निरुत्तर झाले. युवा कार्यकर्त्यांनी धारेवर धरून आक्रमक होताच मारहाण केलेल्या त्या शिक्षकाने माफी मागितली.

Yuva samiti
सदर शाळेत महात्मा फुले आणि छत्रपती शिवरायांचा फोटो इतर राष्ट्रपूरूषां सोबत तुम्ही का लावत नाही असा प्रश्न उपस्थित केल्यावर मराठी विषय शिकवणाऱ्या  शिक्षिकेने फोटो लावायला जागा नाही असे बेजबाबदारीचे उत्तर दिले त्यावर देखील त्या शिक्षकेचा चांगलाच समाचार घेतला गेला.शिक्षक वर्ग या प्रकरणाला भाषिक वाद देण्याचा प्रयत्न करत होते मात्र युवकांनी छत्रपती शिवराय हे राष्ट्रपुरुष आहेत त्यांची घोषणा देणे गुन्हा नव्हे याची जाणीव करून देताच ते गप्प बसत होते.

एकूणच अल्पसंख्याक समाजाच्या या शाळेत शिवराय प्रेम नसल्याचे दिसून आले इथे छत्रपतींच्या जयघोषाला विरोध होतो त्यामुळं आम्हाला आपलेपण वाटत नाही अशी तिखट प्रतिक्रिया युवा समितीच्या कार्यकर्त्यानी दिली आहे.बालदिनाच्या कार्यक्रमावेळी अशी घटना घडल्याने मराठी भाषिकात संतापाची लाट उसळली आहे. श्रीकांत कदम, शुभम शेळके, अंकुश केसरकर, संतोष कृष्णाचे, सूरज कुडुचकर, वेंकटेश पाटील, आदींनी शाळेत जाऊन जाब विचारला.

 belgaum

1 COMMENT

  1. Chatrapati shivaji maharaj ki jai mhanane jar tyanchya dhrushti ne gunha aahe tar mag pakistan zindabad che naare lavaya pahijet ka Deshacha itihas hyana dhad mahit nahi anhi swatala shikshak mhanun ghyaychi layki tari aahe ka hyanchi Nusta nava cha baal din he lok sajara karatat hyana Fakta anhi fakta aaplach kharra karaycha astai hya murkha lokana kay mahiti Bhintit photo lavanya purvi Manat jaga havi lagate ti hya chotya manachya lokanchyat kashi asnar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.