गेल्या दोन दिवसापूर्वी वैयक्तिक कारणातुन झालेल्या दगडफेकी नंतर सोमवारी रात्री पुन्हा खंजर गल्ली परिसरात अति तुरळक दगडफेक झाल्याने बराच गोंधळ झाला होता.
सोमवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान अज्ञातांनी अति तुरळक दगडफेक केली आणि फेकलेली काचेची बाटली कार गाडीवर पडली त्यानंतर या भागात भीती पसरली होती तणाव निर्माण झाला होता मात्र घटनास्थळी मार्केट पोलीस दाखल होऊन त्यानी सर्व दुकाने बंद करायला लावली अन त्यानंतर या भागातील तणाव निवळला आहे.
खंजर गल्ली भागात झालेल्या तुरळक दगडफेकी नंतर शहरात अफवांचे पीक पसरले असलं तरी प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.उत्तर भागात वारंवार होणारे तुरळक दगडफेकीचे प्रकार तेही ऐन अधिवेशनाच्या तोंडावर त्यामुळे पोलीस खात्याची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत चालली आहे
दोन दिवसा पूर्वी याच भागात डी सी पी सीमा लाटकर यांनी शोध मोहीम राबवून घरातील दगड आणि काचेच्या बाटल्या जप्त केल्या होत्या.या भागात वरचेवर असे प्रकार होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी शहरात शांतता असून कुणीही अफवा वर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे.
हिंडलगा येथे शांतता सभा
दरम्यान रविवारी रात्री हिंडलगा येथे देखील दगडफेक झाली होती या प्रकारा नंतर पोलीस आयुक्त डी सी राजप्पा उपायुक्त सीमा लाटकर यांनी हिंडलगा गावाला भेट देऊन शांतता सभा घेतली शांतता राखण्याचे आवाहन देखील केलं आहे.
I see you don’t monetize belgaumlive.com, don’t waste your traffic, you
can earn additional bucks every month with new monetization method.
This is the best adsense alternative for any
type of website (they approve all websites), for more details simply search in gooogle: murgrabia’s tools