सावगाव येथील तलावात पोहायला गेलेले चौघे युवक बुडल्याचा संशय असल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.
पोलीस खात्याने पाण बुड्या सह बुडालेल्या युवकांचे मृतदेह शोध मोहीम सुरू केली आहे.घटनास्थळी बेनकनहळळी आणी सावगाव गावच्या लोकांनी गर्दी केली आहे.मृत झालेल्या संशयितांच्या नातेवाईकानी देखील गर्दी आहे.
बुडालेल्या युवकांना साहिल बेनके असून आणखी कोण तिघे त्यांची नाव समजू शकली नाहीत.तलावा बाहेर दोन एकटीव्हा दुचाकी चार बुटाचे जोड कपडे आहेत त्यामुळे चौघे बुडाल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. घटनास्थळी असलेल्या मुलांच्या कपड्यां वरूनही ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.मयत हे चार युवक असून एक बेनकनहळळी तर अन्य बेळगावचे असल्याची शक्यता आहे.या घटनेमुळे या गावावर शोककळा पसरली आहे.
सावगाव आणि बेनकनहळळी गावाच्या मधोमध हा तलाव आहे त्याला सावगाव धरण असे म्हटले जाते. घटनास्थळी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी भेट देऊन पाहणी केली तर ग्रामीण पोलीस निरीक्षक संगमेश शोध मोहिमेत सहभाग घेऊन आहेत.ग्रामीण पोलीस निरीक्षक संगमेश यांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीनुसार साहिल युवराज बेनके वय 16 रा. बेनकनहळळी आणि त्याचे तिघे मित्र पोहायला गेले होते ते चार जण ही बुडल्याचा संशय आहे.आम्ही शोध मोहीम हाती घेतली असून मृतदेह मिळल्यावरच अधिकृत पुष्टी होणार आहे.