कुठल्या वार्डात काय? आढावा बेळगाव live चा…….
महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे. मागील निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी मागील साडेचार वर्षात आपल्या वार्डात काय केले आणि आपल्याला निवडून आलेल्या जनतेला काय दिले याचा आढावा बेळगाव live घेईल.
निवडून आल्यावर बऱ्याचदा चांगली कामे होतात, पण ती जनतेसमोर सांगायचे राहून जाते. निवडणुकीच्या तोंडावर हा आढावा महत्वाचा असतो. जनतेसमोर आपण केलेल्या कामाचे स्कोअर बुक मांडून जनतेचे प्रमाणपत्र मिळवून घ्यायची हीच संधी असते.
मी भरपूर काही केले असे खासगीत बोलण्यापेक्षा या बेळगाव live कडे. तुमचे काम तुम्ही द्या आम्ही ते जनतेपर्यंत पोहोचवू.
वॉर्ड क्रमांक २८ च्या विद्यमान नगरसेविका आणि एक वेळ बेळगाव शहराच्या उपमहापौर होण्याची संधी लाभलेल्या रेणूताई मूतकेकर यांनी आपण स्वतः आपल्या वार्डात करून घेतलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर केला आहे. मागील साडेचार वर्षात वार्डात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच विकासाचा पाऊस पाडला आहे असे त्यांनी बेळगाव live कडे बोलताना सांगितले.
त्यांचा वॉर्ड हा मध्यवर्ती भागात आहे. शिवाजी रोड, मुजावर गल्ली, पाटील गल्ली, कांगले गल्ली, पाटील मळा, ताशीलदार गल्ली, भांदूर गल्ली, कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, कपिलेश्वर मंदिर, संभाजी गल्ली, महाद्वार रोड क्रॉस नंबर १ असा भाग त्यांच्या वार्डात येतो. आपण संपूर्ण विभागात चांगली कामे मंजूर करून आणली आहेत. असे त्यांनी सांगितले.
बेळगाव शहरात गाजलेल्या सभांचे ऐतिहासिक संभाजी उद्यान रेणूताईंनी मंजूर करून घेतलेल्या भव्य व्यासपीठामुळे नवा चेहरा मिळवून उभे आहे. या उद्यानासाठी बुडा कडून २५ लाख रुपये मंजूर करून घेऊन व्यासपीठ निर्मिती करून घेतली आहे अशी माहिती त्यांनी दिली. तरुण बलदंड आणि व्यसनमुक्त व्हावे ही आपली इच्छा असल्याने भांदूर गल्ली येथील स्वराज्य व्यायाम शाळेला २० लाख रुपयांचे आधुनिक जिमचे साहित्य आपण दिले. एक नगरसेविका म्हणून ते आपले कर्तव्य आपण केले आहे असे त्यांनी सांगितले आहे.
प्रत्येक गल्लीतील ड्रेनेज आणि गटार व्यवस्था कोलमडली होती. ही व्यवस्था नवीन बांधणी करून सुरळीत करणे, भांदूर गल्लीत भुयारी गटारांची समस्या मोठी होती ती व्यवस्थित करणे, पाण्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी सगळीकडे बोअर मारून पाईपलाईन द्वारे पाणी पुरवणे, बऱ्यापैकी पाणी समस्या सोडवणे, ब्रिजखाली रेल्वे गेट असलेल्या ठिकाणी एक पाईप मधून दोन लाईन चे ड्रेनेज पाणी जाते यातून निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी वेळीच पाठपुरावा करत असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.
रेणूताईंनी केलेल्या कामांची यादी पुढीलप्रमाणे.(रस्ते, गटारी, पेवर्स व इतर)
१. सरकारी शाळा करा ३ बांधली १० लाख
२. मीनाक्षी भवन सीडी—-५७ लाख
३.शिवाजी रोड नाला—–९५ लाख
४. हेमू कलानी चौक सुधारणा—-५ लाख
५. तांगडी गल्ली स्वच्छतागृह——१० लाख
६.शिवाजी रोड स्वच्छतागृह —-१० लाख
७. संभाजी उद्यान शेजारी स्वच्छतागृह—- १० लाख
८. संभाजी गल्ली वॉटर लाईन बदल—-५ लाख
९. पाटील गल्ली रस्ता, लाईट, गटार—-१.५० लाख
१०. ताशीलदार गल्ली रस्ता व गटार——- १५ लाख
११. भांदूर गल्ली रस्ता व गटार—–३० लाख
१२. संभाजी गल्ली रस्ता व एक बाजूने गटार—–१५ लाख
१३.पाटील मळा सीसी रोड व गटार——- २५ लाख
१४. महाद्वार रोड सीडी वर्क —— ३० लाख
१५. भांदूर गल्ली भंगी पॅसेज रोड व गटार—–३० लाख
१६. साळुंखे शेजारी पेवर्स——५ लाख
१७. संभाजी गल्ली मागील रस्ता व गटार—–२० लाख
१८. भांदूर गल्ली भंगी पॅसेज व भुयारी ड्रेनेज लाईन——१० लाख
१९. कपिलेश्वर मंदिर पेवर्स व गटार—-१५ लाख
२०. पाटील गल्ली आतील सर्व रस्ते व गटार—-८० लाख
२१. शिवाजी रोड रस्ता—–२० लाख
२२. कपिल बेकरी मागील गटार—–१० लाख
२३.तांगडी गल्ली गटार——१२ लाख
२४. मुजावर गल्ली सीडी वर्क——५ लाख
२५. दोन्ही मुजावर गल्ली सर्व गटारी व रस्ते—— २० लाख