संमिश्र सरकार कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला तीन महिने गैर हजर असलेले बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होते खरे मात्र ऊस उत्पादक आणि थकीत बिलाचा मुद्दा चर्चेला आला असता नाराज होऊन मंत्री मंडळ बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे.ऊस बिलाचा मुद्दा बैठकीत चर्चिला गेला आहे.
बेळगाव जिल्ह्यासह राज्यात ऊस उत्पादकांचा प्रश्न पेटला असल्याने सोमवारी याच मुद्द्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ऊस कारखान्यानी शेतकऱ्यांची थकीत बिले रोखून धरली आहे या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांनी काही मंत्र्यांची झडती घेतली. थकीत बिल अध्याप दिली नसल्याने याचा परिणाम राज्य सरकारवर होत आहे.
मंत्री पदावर असतेवेळी ऊसाची बिल अजून का दिली नाहीत तुम्हीच मंत्री होऊन बिल अडवली तर शेतकऱ्यांच्या समस्या कोण सोडवणार असा प्रश्न उपस्थित केले त्यामुळे नाराज रमेश जारकीहोळी मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले असल्याची माहिती मिळत आहे.