गंभीर आजार आणि इतर कारणांनी वैफल्यग्रस्त बनलेल्या रेल्वे ट्रॅकमन ने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. पाटील गल्ली तांगडी गल्ली जवळ रेल्वे रुळावर आज सकाळी ही घटना घडली आहे.
व्यंकटेश हिरेमठ(वय ३५) मुलाचा रा . मिरज असे त्याचे नाव आहे. तो कुडची येथे ट्रॅक मन ची सेवा निभावत होता. अनगोळ येथे आपल्या कुटुंबासमवेत भाड्याने राहात होता.
एक गंभीर आजाराने त्याला ग्रासले होते. घटना घडताच त्याचा मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टेम साठी पाठवला आहे.
व्यंकटेश याचे लग्न झाले आहे. त्याला मुले आहेत. आई वडील मिरजेला असतात. रेल्वे पीएसआय बी टी वालीकर यांनी घटनेची कार्यवाही पाहिली आहे. आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.