गेले आठवडा भर गाजत असलेले शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिल आंदोलनात ऊस रोज नवनवीन टीका वक्तव्य घटना समोर येताहेत.रविवारी सुवर्ण सौध मध्ये घडलेल्या प्रकारा शेतकरी नेत्यांना अटक झाली आहे त्यानंतर रविवारी सायंकाळ पासूनच शेतकऱ्यांनी डी सी ऑफिस समोर आंदोलन सुरू केलं आहे.
थकीत ऊस बिलाच्या मागणीवर शेतकरी ठाम असून मुख्यमंत्री कुमारस्वामीं यांनी शेतकऱ्यांना दिलेलं चर्चेचा बंगळुरूला आमंत्रण ठोकरल असून विधान सौध ला घेराव घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
दरम्यान या शेतकरी आंदोलनात सहभागी असलेली महिला शेतकरी नेता जयश्री गुरणणावर आणि मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांच्यात वाकयुध्द रंगल आहे.रविवारी कुमार स्वामी यांनी जयश्री शेतकरी नव्हेत असा आरोप केल्यावर काल जयश्री हिने मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती आपण शेतकरी असल्याचे म्हटले होते.
सोमवारी पुन्हा कुमार स्वामी या महिला नेत्यांवर टीका करत शेतकऱ्यांची कैवारी असणारी चार वर्षे कुठं झोपली होती अशी बोचरी केली आहे त्यावर जयश्री हिने जोरदार
प्रत्त्युत्तर देताना गहिवरून जात माध्यमाना रडतरडत प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री तुम्ही राज्यातील समस्त महिला समाजाचा अपमान केलाय तुम्ही चार वर्षे कुठं झोपला होता ?असा प्रश्न उपस्थित केलाय.
एकूणच शेतकरी नेता विरुद्ध मुख्यमंत्री यांच्यातलं वाकयुद्ध जोरदार असून बेळगाव जिल्ह्यातील ही महिला आंदोलक मात्र चर्चेत आली आहे.
या शेतकरी नेता महिलेचं गहिवरत कुमारस्वामींना दिलं त्याचं भाषेत प्रत्त्युत्तर खालील लिंक क्लिक करा पहा व्हीडिओ