पूनमचा चेहरा अगदी रेखीव, गौरवर्ण, चाफेकळी नाक, सुंदर हसरे बोलके डोळे. नावाप्रमाणेच पौर्णिमेच्या चंद्रासारखी शीतल व सुंदर दिसायची. पण अलीकडे या चंद्रासारख्या चेहर्यावर रोज एक नवीन डाग दिसायचा. म्हणजे काय झालं, अलीकडे तिला फारच पिंपल्स येऊ लागले होते आणि कॉलेजमध्ये पिंपल पिंपल्स लिटल स्टार अशा कॉमेंट्स ऐकायला मिळू लागल्या. स्किन स्पेशालिस्टना दाखवून झालं पण मुरुमच ते, औषधं घेतली की चार दिवस कमी वाटणार परंतु पुन्हा येरे माझ्या मागल्या.
पूनमच्या मैत्रिणीनं तिला होमिओपॅथीविषयी सांगितलं. तिचेसुद्धा मुरुम, केस गळणं होमिओपॅथीक औषधानेच कमी झाले होते. ती पूनमच्या आमच्याकडे घेऊन आली. तेव्हा पुनमला एकंदर पंपल्सविषयी पूर्ण माहिती दिली व औषधं पण दिली. औषधांशिवाय तिला होमिओपॅथीक सौंदर्य प्रसाधने वापरण्यात दिली. उदा. क्लिनझर्स, स्क्रबस, डे विअर क्रिम्स, फेसपॅक इत्यादी. आहार व पथ्य वगैरे सांगितले आणि दोनच महिन्यात चंद्रावरचे डाग पूर्णपणे नाहीसे झाले. पुनम एकदम खूष. आता सध्या तिचे औषधे बंद आहेत. परंतु ती होमिओपॅथिक सौंदर्यप्रसाधनचं कायम वापरते. कारण एकतर ही प्रसाधनं दुष्परिणामविरहित आहेत शिवाय कायम वापराने त्वचा, केस यांच्यावर एक नैसर्गिक झळाळी येते.
मुरुम किंवा तारुण्यपिटिका म्हणजे काय?
मुरुम म्हणजे बारा ते पंचवीस वयोगटातील मुलांमुलींनी हमखास होणार त्वचाविकार. त्वचेतील केसपुटकांतून केस उगवतात. त्याच्या मुळाशी तैलग्रंथी असतात. केसपुटकांना व तैलग्रंथींना सूज येऊन मुरुमे येतात. चेहरा, गळा, छाती, खांदे येथील त्वचेवर मुरुमांमुळे झालेले व्रण दिसून येतात या वयात मुलं मुली आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल अतिशय जागरुक असतात आणि याच वेळी पिंपल्सचा विकार बळावतो.
कारणे :
1) वयात आल्यावर हार्मोन्सच्या पातळीमध्ये वाढ होत राहते व त्वचेचा तेलकटपणा वाढतो व मुरुम येतात.
2) मुळातच तेलकट त्वचा असणार्यांना ठरावीक वयात खूप पिंपल्स येतात.
3) बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ नसेल तरीही मुरुमांचा सतत प्रादुर्भाव होत राहतो.
4) चेहरा स्वच्छ न ठेवल्याने चेहरा चिकट, तेलकट होऊन पिंपल्स येऊ शकतात.
5) पाळी पुढे ढकलण्याच्या, कुटुंबनियोजनाच्या गोळ्यांमुळे मुरुम येऊ शकतात.
6) चहा, कॉफी, तंबाखू व दारु यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडते
7) डोक्यात कोंडा, खरबा असल्यास त्याची पावडर तोंडावर पडून फोड येऊ शकतात.
8) मासिक पाळीच्या अगोदर व पाळीच्या वेळी हार्मोन्सच्या चढउतारामुळे मरुम येतात. हे मुरुम कोणत्याही वयात येतात.
लक्षणे : मुरुम म्हणजेच चेहर्यावर येणार्या टपोर्या काळ्या लालसर पुटकुळ्या, त्वचेच्या वरच्या थरात येणारी गळवे व व्रण मुरुमांचे सहा प्रकार आहेत. यांची तीव्रता कमी जास्त असू शकतो. छोटे पुरळ येण्यापासून ते पू व रक्त भरणारे, ठसठसणारे फोडसुद्धा येतात.
कपाळ, गालाचे उंचवटे, हनुवटी, कानशिले, छाती व पाठ यावर मुरुम जास्त आढळून येतात. क्वचित अंगभरही विकार होतो.
उपचार : सर्वात चांगले व सर्वांगिण उपचार होमिओपॅथीमध्ये होतात. पोटात घेण्याच्या औषधांपासून ते आम्ही स्वत: तयार करत असलेल्या होमिओपॅथीक सौंदर्य प्रसाधनापर्यंत सर्व उपचार उपलब्ध आहेत. पाहूया काही औषधांची माहीती.
सोरिनम : मासिक पाळीच्या वेळेसच पिंपल येतात. चरबीयुक्त पदार्थ, साखरेचे पदार्थ कॉफी व मांसाहार घेतल्याने जास्त होतात.
सल्फर : त्वचा रोगट दिसते. बारीक, लाल पुरळ येतात. खूप गाज सुटते व आग होते. सतत नवीन रॅश येतच राहते.
मॅग मूर : शौचास अजिबात साफ होत नाही. त्वचा चिकट दिसते. मोठेमोठे घट्ट मुरम येतात. चेहरा सुजल्यासारखा होतो. व्यक्ती तितकी औषधं म्हणण्याइतपत औषधं होमिओपॅथिक शास्त्रात उपलब्ध आहेत. ही औषधं दुष्पपरिणाम विरहित असल्याने कोणतेही त्रास होत नाहीत. चेहरा स्वच्छ तजेलदार दिसतो.
इतर उपचार
चेहरा स्वच्छ धुवावा. दिवसातून तीन चार वेळा चेहरा थंड पाण्याने धुवावा. आठवड्यातून एकदा वाफ घ्यावी. पोट स्वच्छ ठेवावे. अरबट चरबट तेलकट खाऊ नये. भरपूर पाणी प्यावे.
मेथीच्या पानांचा किसलेल्या भोपळ्याचा लेप लावल्याने त्वचा स्वच्छ होते.
संत्र्याच्या सालीने चेहरा चोळल्यास तेलकटपणा कमी होतो.
कोथिंबीर व पुदिन्याचा रस व हळद यांचे मिश्रण लावल्याने चेहरा स्वच्छ होतो.
मोकळ्या हवेत फिरावे. थंडपाण्याचे सपके चेहर्यावर मारावे.
सर्व जीवनसत्वे व झिंक असणारी रोज एक गोळी घ्यावी.
प्रसाधने वापरताना होमिओपॅथिक किंवा हर्बल वापरावीत.
इप्सम सॉल्ट बाथ हा प्रकार निसर्गोपचारात केला जातो. दीड किलो इप्सम सॉल्ट (मॅग्नेशियम सल्फेट) 60 लिटर पाण्यात मिसळावे. पाण्याचे तापमान व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाइतके असावे. या पाण्यात त्या व्यक्तीला अर्धातास बसवावे. त्यामुळे सर्वांगाला घाम येऊन त्वचेतील अपायकारक द्रव्ये शरीरातून बाहेर पडतात व त्वचेचे आरोग्य सुधारते.
ठिकाण