बेळगाव शहरात हिंडाल्को जवळ नागरी वस्तीत निदर्शनास आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्यानं मोहीम आखली आहे.सदर बिबटया काकती जंगल परिसरातून कुत्र्याची शिकारी साठी या भागात आला असावा अशी शक्यता वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी सकाळी पासूनच सोशल मीडियावर बिबट्याचा व्हीडिओ वायरल झाल्या नंतर जागे झालेल्या वन अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम आखून बिबट्याला पकडण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.हिंडाल्को जवळील झुडुपे काकती डोंगर परिसरात तपास मोहीम हाती घेतली.
बेळगाव रेंजर श्रीनाथ कडोलकर यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत वन अधिकाऱ्यांनी काकती जंगल आणि हिंडाल्को परिसरात कुत्रा लावून साफळा रचला आहे.गुरुवारी रात्री ज्या भागात बिबट्याचा वावर झाला होता त्याच्या पायाची निशाण वन खात्याला मिळाली आहेत त्यानुसार साफळा रचून शुक्रवारी रात्री नेमकं त्याचं भागातून त्याला पकडण्याची तयारी वन खात्याने केली आहे.शुक्रवारी रात्री हिंडाल्को भागात वन खात्याच्या दोन टीम कार्यरत असणार आहेत.
वन खात्याला बिबट्याचे आलेले गेलेले दोन्हीही पायाची निशाण सापडली आहेत त्यानुसार आम्ही साफळा रचलाय तो काकती वन क्षेत्रातून आला आहे अशीही माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.