बेळगावच्या शेतकऱ्यांना कोलकाता कोर्टने अटक वारंट जारी केल्याची माहिती मिळत आहे या शेतकऱ्यां विरोधात कोर्टाने हे अटक वारंट जारी केलं आहे. अक्सिस बँकेने सरकारच्या आदेशाला कवडीमोल किंमत दिल्याने हे वारंट जारी झाले आहे.
बँकांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटीस वारंट जारी करू नये असा आदेश देण्यात आला होता मात्र अक्सिस बँकेने या आदेशाला केराची टोपली दाखवत वरील वारंट पाठवले आहे.
अक्सिस बँकेकडून कर्जाची परतफेड न झाल्याने वरील आदेश बजावण्यात आलं असून सौन्दती तालुका एणगी गावच्या बसप्पा हुबळी आणि भिमाप्प पुजारी आदी शेतकऱ्यांना हे वारंट पाठवले आहेत.
बैलहोंगल येथील अक्सिस बँक मधून शेतकऱ्यांनी कर्ज काढली होती ती वेळेत न भरल्याने बँक अधिकाऱ्यांनी कोलकाता कोर्टात धाव घेतली होती त्या नंतर कोर्टाने हे अटकेचे वारंट बजावले आहेत.बेळगावं जिल्हा पोलिस कार्यालयातुन हे वारंट जारी झाले असून सौन्दत्ती पोलीस त्या शेतकऱ्यांचा शोध घेत आहेत.
मुख्यमंत्री कुमारस्वामीं यांचा हस्तक्षेप
या अटक वारंट नंतर मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांनी शेतकऱ्यांचे हित जपा असा आदेश जिल्हाधिकारी एस बी बोमनहळळी यांना दिला आहे.पोलीस अधीक्षक आणि डी सी दोघांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून या घटनेचा अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार राहील शेतकऱ्यांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी केलं आहे.