बिबट्याचा प्रश्न सध्या गंभीर बनत चालला आहे. बेळगाव पासून चंदगड पर्यंतचे नागरिक धास्तीत आहेत. असे असतांना वनविभाग आणि लोकप्रतिनिधी नेमके काय करत आहेत याचा आढावा जि प संदस्या सरस्वती पाटील यांनी आज बिबट्या असलेल्या भागात जाऊन घेतला. मराठी द्वेष्ट्या अधिकाऱ्यांना लेफ्ट राईट घेऊन आणि शेतकरी व जनतेला धीर देऊन त्या आल्या आहेत. जे काम त्या भागाचे आमदार खासदार करत नाहीत ते काम सरस्वती पाटील या सीमाभागाच्या वाघिणीने करून दाखवले आहे.
बिबट्याचा आढावा घेण्यासाठी कुद्रेमानी येेेथे गेल्या असता त्यांनी आर एफ ओ कडोलकर याला कॉल केला असता ते कन्नड मधून बोलत होतेे. सरस्वती ताईंनी हिंदीत बोलताच त्या अधिकाऱ्याचा मराठी द्वेष्टीपणा उफाळून आला आणि त्याने कर्नाटकात राहता तर कन्नड बोला असे बोलण्यास सुरुवात केली.कन्नड मध्ये बोलता येत नाही काय? असे विचारणाऱ्याला सरस्वती ताईंनी चांगलेच झाडले. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तुम्हाला हिंदी येत नाही काय असा उलट प्रश्न विचारल्यावरकडोलकर शांत झाला.
त्यानंतर डेप्युटी आर एफ ओ विनय गौडर हे स्पॉट ला आले त्यांनी सदस्यां सोबत कुद्रेमनी पासून ढेकोळी व इतर सर्व भाग पिंजून काढण्यात आला आहे. बिबट्याने काही शेळ्या व कुत्र्यांचा फडशा पाडला असून लवकर बंदोबस्त करा अशी सूचनाही केली आहे.शेतकरी भीतीच्या छायेखाली होते त्यांनाही सरस्वती पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
हिंडालको भागात एक न्याय आणि मराठी भागात बिबटया आल्यास एक न्याय अशी भूमिका वन खात्याची असू नये सगळीकडे समान न्याय दिला पाहिजे अशी भूमिका देखील यावेळी मांडण्यात आली.