बेळगाव शहरात पाळीव कुत्री हरवणे आणि चोरण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. पुरावा दिल्यास पोलीस तक्रार नोंद करून घेत आहेत पण पुढे काहीच होऊ शकत नाही. कुत्र्यांचे मालक आपले कुत्रे शोधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत.
टिळकवाडी, हिंदवाडी आणि कॅम्प भागातील कुत्री हरवण्याचा किंव्हा चोरल्या जाण्याच्या घटना जास्त आहेत. ४ लॅबरेडॉर, ५ इतर, ३ पोमेरियन आणि सहा भटकी कुत्री चोरीला गेली आहेत अशी प्राथमिक माहिती आहे.
आपल्या कुत्र्यांची काळजी घेतली नाही तर ती भटकतात असेच जाणवत आहे. यंदा दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाने भटकून अनेक कुत्री गायब झाली आहेत.
काही घटनात सापडलेल्या कुत्र्यांचा शोध लावण्यासाठी नागरिकांनीही सोशल मीडियाचा वापर करून घेतला आहे आणि कुत्र्यांना त्यांच्या पालकांकडे पोहोचवण्यात यश आले आहे.आपली पाळीव कुत्री हरवली जाऊ नये म्हणून काही काळजी घेतली पाहिजे.
१. आपल्या कुत्र्याच्या गळ्यात त्याचे नाव घाला
२.त्यांना मोकळे सोडू नका, फिरायला जायचे असल्यास एकटे सोडू नका.
३. योग्य लसीकरण करा