कुद्रेमानी सह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील गावातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरणात काय कमी होताना दिसत नाही झाले आहे.गेल्या आठवड्यात शेतीवाडीत दिसलेला बिबट्या चंदगड तालुक्यातील जंगलात गेल्याचा दावा वन अधिकारी करत असतानाच तीन पिल्लं आढळल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांत भीतीचं वातावरण पसरले आहे.
गुरुवारी दुपारी कुद्रेमानी शेत वाडीतील हुवप्पा पाटील यांच्या शेतात तीन पिल्लं सापडली त्यामुळं पुन्हा एकदा शेतकरी वर्ग भीतीच्या छायेखाली आहेत.या ठिकाणी मिळालेली पिल्लं ही बिबट्याची आहेत की तरसाची की रान मांजराची आहेत कीअन्य कोणत्या प्राण्यांची याबाबत अजूनही संभ्रम आहे.
लागलीच वन खात्याच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले तीन पैकी दोन पिल्ले वन खात्यानं ताब्यात घेतली असून तिसरं एक पिल्लू त्याच ठिकाणी ठेवण्यात आलं आहे.रात्री त्या ठिकाणी त्या पिल्लासाठी तो प्राणी तिथे येईल अशी शक्यता असल्याने वन खात्याने ट्रॅप कॅमेरा बसवला आहे. वन अधिकारी श्रीनाथ कडोलकर उपवन अधिकारी विनय गौडर यांच्या नेतृत्वात वन खाते जागे झाले असून पिल्ला साठी कोणता प्राणी येतो याच निरीक्षण वन खात्याची टीम करणार आहे त्या नंतरच या पिल्ला बाबत माहिती समजणार आहे.
जास्त परिचय नसलेल्या बेळगाव भागात अलीकडेच वन्य जीवींची हालचाल झाल्याने शेतकरी शेतात काम करतेवेळी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत एकूणच वन अधिकाऱ्यांनी या भागात गस्त वाढवायला हवी अशी मागणी होताना दिसत आहे.