तो बिबट्या नसून रानमांजर आहे असे सांगून काही वनाधिकाऱ्यानी माध्यमे आणि जनतेचीही दिशाभूल सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. काही वन अधिकाऱ्यांनी आपले हात झटकण्यासाठी जाणीवपूर्वक हा कांगावा केला असल्याचा आरोप होत आहे.
अचानक एक रात्रीत बिबट्याचे रान मांजर कुणी केले हा संभ्रम वन विभागातील कर्मचाऱ्यांसमोरही पडला आहे. आपण स्वतः बिबट्या पाहिला आहे पण अधिकाऱ्यानी आपले हात झटकून दिशाभूल केले आहेत. त्यांना काम नको असून बिबट्या नाही असे सांगून भीती घालवण्याचे काम सुरू आहे पण असे करून धोका टाळला जात नाही. शोध सुरूच असून धोका सुद्धा कायम आहे असे एक वन कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
एकीकडे हे अधिकारी रान मांजर असल्याचा दावा करत असले तरी हिंडालको कॉलनीतील दोन कुत्र्यांचा फडशा कोणत्या प्राण्याने पाडला?का अजूनही या कॉलनीतील क्वाटर्स मधील लहान मुलांना बाहेर पडू देत नाहीत?बंदोबस्त वाढवण्यात आलाय ही कारणे गुलदस्त्यात आहेत.अनेक स्थानकानी या कॉलनीत बिबटयाच आला होता आम्ही प्रत्यक्ष दर्शी आहोत असं देखील म्हटलंय.या भागात रात्रीच्या गस्ती सुरू आहेत. बंदोबस्त वाढवला आहे. शोध कायम असून ते रान मांजर नाही बिबट्याच आहे असे स्थानिकांनी सांगितले आहे.
काही धोका झाला तर दिशाभूल करणाऱ्या आर एफ ओ वर कारवाई व्हावी आणि वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. बिबट्याचा शोध लावून जनतेला संकटातून दूर करावे ही मागणी आहे