Tuesday, February 11, 2025

/

विजय मोरें यांना समाजसेवेचा राज्यस्तरीय पुरस्कार

 belgaum

माजी महापौर आणि समाजसेवक विजय मोरे यांना समाज सेवेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रपिता महात्मा जोतीबाराव फुले आदर्श समाजसेवक’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

vijay more social work
संविधान दिनाचे औचित्य साधून ही संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असलेल्यांना राज्य स्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करत असते यावेळी या पुरस्कारासाठी विजय मोरे यांची निवड करण्यात आली आहे.रविवारी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन हॉल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

शेकडो बेवारस मृतदेहांचा अंतिम संस्कार,शांताई वृद्धाश्रमाच्या माध्यमातून अनेक वृद्धांना आधार तर रद्दी गोळा करून गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत देणे अशी अनेक सामाजिक कार्ये ते करत आहेत त्यामुळेच त्यांना हा राज्य स्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.