सध्या मनोरंजनाच्या क्षेत्रात लघुपट हे माध्यम अतिशय प्रभावी ठरत आहे आणि म्हणूनच सोसायटी ऑफ आर्टिस्टिक व्हिजन आणि नियती क्रिएशन्स संयुक्त विद्यमाने दि. १६ डिसेंबर २०१८ रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे ३रा बेळगांव आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून बेळगावात आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव साजरा करत आहेत लघुपटांचं सुंदर विश्व असून. गेल्या दोन वर्षांपासून या महोत्सवात जगभरातील दर्जेदार लघुपट दाखवले आहेत. ३रा बेळगांव आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव प्रवेशासाठी खुला आहे. यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेसाठी स्विकारले जातील. कोणत्याही भाषेतील लघुपट इंग्लिश उपशीर्षकासहित स्विकारले जातील. लघुपटांची लांबी १५ मिनिटांपेक्षा जास्त असू नये. २५ नोव्हेंबर पर्यंतच प्रवेश स्वीकारले जातील.अशी माहिती देण्यात आली आहे.
परीक्षक:
1) अंबर हडप: सुप्रसिद्ध पटकथा लेखक ज्यांनी “बालक पालक”, “येल्लो” आणि “अंड्या चा फंडा” या सारख्या सुपरहिट चित्रपटांचे पटकथा लेखन केले आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला “हिचकी” हा राणी मुखर्जीचा हिंदी चित्रपट याचे पटकथा लेखन अंबर हडप यांनी केले आहे.
2) किरण हंपापुरा: सॅण्डलवूड मधील एक सुप्रसिद्ध आणि ख्यातनाम छायाचित्रकार ज्यांनी “Beautiful Manasugalu” “Madamakki सारख्या बिग बजेट सिनेमांमधून आपले छायाचित्रीकरणाचे कौशल्य दाखवले आहे.
3) वसीम मनेर: “होउ दे जरासा उशीर” या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि छायाचित्रकार. हा पहिला मराठी चित्रपट ज्याची पटकथा ऑस्कर लायब्ररीमध्ये समाविष्ट केली गेली आहे. “कापूस कोंड्याची गोष्ट” या चित्रपटाचे छायाचित्रकार ज्याला महाराष्ट्र राज्याचे पारितोषिक मिळाले आहे. ते भारतातील वेगवेगळ्या चित्रपट निर्मिती शाळेत अतिथी प्राध्यापक आहेत.
नियमावली आणि प्रवेशिकेसाठी कृपया [email protected] या पत्यावर मेल कराअसेही कळवण्यात आले आहे.