काल पासून असलेल्या ढगाळ वातावरण आणि वळिव पावसाने बेळगाव परिसर शिवारातील शेकडो भात मळण्या अर्धवट आहेत.सुगी संपवून शेतकऱ्यानीं शेतात भाताच्या गंज्या घालून रब्बी पीकं पेरुन आता मळण्या करण्यास सुरुवात केली होती मात्र पाऊस या वातावरणात बळी राजाची चिंता वाढली आहे.
शेतकऱ्यांच्या घरातील कांही पुरुष मंडळी गवंडी,सेंट्रिंग,फर्निचर तसेच इतर अनेक कामं करतात.रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने त्यादिवशी सर्वजन खाली असतात त्यामुळं रविवारी अनेक मळण्या घालण्यात आल्या होत्या.
एकीकडे मजूरांचा तुटवडा असल्याने सुट्टीच्या दिवशी काम करावी लागत आहेत.शेतकऱ्यानीं शनिवार, रविवारी भाताच्या मळण्या घातल्या पण अचानक हवामान बदल झाले आणी वळिव पाऊस सुरु झाला कांहींचे भात वाऱ्याला लावून रास केली अर्धवट माळण्या झाल्या तोच अचानक पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती
भात ते कस झाकून ठेवायच कळत नव्हतं कारण जमीनीवर तट्ट अंथरली होती.
काहींनी पाऊस थोडा कमी झाल्यावर कांही शेतकऱ्यांनी गडबडीने केलेली रास भरुन घरी आणली पण अर्धवट झालेली मळणी तिथेच ठेऊन वरती परत मोठी तट्ट पांघरण्यात आली आहेत भातावर गवत टाकून घरी आल्यावर रात्री परत मोठा पाऊस आला होता सोमवारी सकाळी देखील अजूनही ढगाळ वातावरण आहे ते कमी होतानां दिसत नसल्याने शेतकऱ्यांना उन येईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. कारण पाऊस पुन्हा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केवळ मळण्या नव्हे तर कापत असलेली भात पीक देखील पावसात अडकल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.