उद्यमबाग येथील हॉटेल विराट मध्ये शिरून हॉटेलची तोडफोड व तांगडी गल्लीत तीन मोटारसायकल फोडल्याची घटना काल रात्री उशिरा घडली आहे. याबद्दल उद्यमबाग पोलीस स्थानकात सतरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अटक सत्र सुरू केले आहे.
अनगोळ मध्ये दोन हिंदू संघटनात निर्माण झालेला वाद दोन गटात होता. काही वेळेनंतर यापैकी एक गट हॉटेल मध्ये आला व तोडफोड झाली आहे.विराट हॉटेलचे मालक कपिल भोसले यांनी याबद्दल फिर्याद दिली आहे.विराट हॉटेल तोडफोड प्रकरणी काही जणांना अटकही झाली आहे.भादवी कलम १४३,१४७,१४८,४२७,४४८,५०४,५०६,१४० अन्वये सतरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत तीन दुचाकी गाडया फोडण्यात आल्या असून ऐन दिवाळीत रात्री उशिरा ही घटना घडली आहे.दरम्यान दुसऱ्या गटानेही परस्परविरोधी फिर्याद दिल्याची माहिती मिळत आहे.
आम्ही एक संघटनेला विरोध केला असा संदेश पसरविण्यात आला होता. अन्य दुसऱ्या संघटनेला पाठिंबा का देता असे विचारून वाद घालून दगडफेक करण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. यामुळे त्या मुलांनी हा प्रकार केला आहे. गैर समजुती तुन हा प्रकार घडला आहे अशी माहिती हॉटेल मालक कपिल भोसले यांनी दिली आहे.
तांगडी गल्लीत दुचाकीवर दगडफेक
दरम्यान याच प्रकरणात अज्ञातांनी तांगडी गल्ली येथील घरा समोर लावलेल्या तीन दुचाकी वर दगडफेक झाल्याचा प्रकार देखील मंगळवारी रात्री घडला आहे.खडे बाजार पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले की तीन दुचाकी वर अज्ञातांनी दगडफेक केली आहे या प्रकरणी खडे बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला याचा तपास करत आहोत.