रोटरी क्लब ऑफ बेळगाव रोटरी अन्नोत्सव २०१९ आयोजित करीत आहे. ४ ते १४ जानेवारी याकाळात सिपीएड कॉलेज मैदानावर हा अन्नोत्सव होणार आहे.
यंदा भव्य स्वरूपात हा अन्नोत्सव होणार आहे. १ लाख ५० हजार चौरस फूट जागेत तो विस्तारलेला असेल. वेगवेगळ्या १६० अन्न पदार्थ व इतर वस्तूंचे स्टॉल्स येथे असतील. काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आग्नेय भारतापर्यंतचे सर्व खाद्यपदार्थ आणि बेळगावचे स्थानिक पदार्थ खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत.
करमणुकीचे कार्यक्रम असणार आहेत. यामध्ये सिलिब्रिटी गायक, आफ्रिकन डान्स शो, जादू, live ऑर्केस्ट्रा, म्युजिकल कॉन्सर्ट असे ११ दिवस चालणार असून लहान मुलांना अम्युजमेंट पार्क हे मोठे आकर्षण असणार आहे.
भव्य व्यासपीठावर भली मोठी एल ई डी स्क्रीन असेल. यावर्षी पार्किंग साठी भव्य जागा ठेवण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी संपूर्ण मैदानावर कार्पेटिंग केले जाणार असून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दरवर्षी हा अन्नोत्सव आयोजित करत आला आहे. यातून मिळणार फायदा सामाजिक कार्यास आर्थिक मदत देण्यासाठी उपयोगात आणला जातो. मागच्या वर्षी झालेल्या अन्नोत्सवातून बेळगाव शहरात तीन स्वच्छतागृहे उभारण्यात आली. तसेच दोन चाइल्ड पार्क विकसित करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी एक रोटरी स्टडी सर्कल ची उभारणी करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग होणार आहे.यावर्षी सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. यामधून गरीब रुग्णांसाठी एक मोठ्या हॉस्पिटलशी संलग्न चॅरिटेबल डायलिसिस प्रकल्प उभारला जाणार आहे.
स्टॉल साठीचे बुकिंग गोवावेस येथील रोटरी कॉर्पोरेशन स्विमिंग पूल येथे १५ नोव्हेंबर पासून सुरू झाले असून तेथे संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.