ऐन नोव्हेंबर महिन्यात यावर्षी बेळगाव जिल्ह्यातील उसाला तुरे येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून लवकरात लवकर कारखानदारांनी उसाची उचल करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील काही दिवसापासून गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यातच शेतकऱ्यांचे आंदोलन आणि कारखानदारांनी थकीत ऊस बिल देण्यात आले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्याची गोची होणार आहे. सध्या जिल्ह्यात उसाला तुरे येत असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
उसाला तुरे येऊ लागल्याने उसाच्या वजनात आता घट होणार आहे. ग्रामीण भागात सध्या जोरदार थंडी पडू लागली आहे. काहींनी ऊस लागवड करण्यास सुरुवात केली असली तरी अजूनही बराच ऊस शेतात तसाच पडून आहे. त्यामुळे याचा फटका आता शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
तसे पाहता यावर्षी गळीत हंगामात ऊस टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे उसाची पळवापळव होणार आहे. मात्र सध्या उसाला तुरे सुटलेल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.