बुदीहाळ येथील शहिद जवान वीर सुपुत्र भोजराज उर्फ प्रकाश पुंडलिक जाधव यांना वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी वीरगती प्राप्त झाली. काल त्यांचे पार्थिव दाखल झाले असून त्यांना आज त्यांच्या गावी शाही इतमामात अखेरचा सलाम दिला जाणार आहे.
त्यांचे पार्थिव आता त्यांच्या गावी पोचले आहे. तेथे ते ग्रामस्थ आणि कुटुंबियांसाठी दर्शनास ठेवले जाणार आहे. प्रांताधिकारी रविंद्र कर्लीगन्नावर यांच्या नेतृत्वाखाली अंत्यविधीची सर्व सरकारी तयारी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनीही यात पुढाकार घेतला आहे.
या शहीद जवानाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. हा संपूर्ण भाग शोकाकुल झाला आहे. आपल्या समोर मोठा झालेला, अंगावर खेळलेला मुलगा देशासाठी प्राण देऊन शहीद झाला याचा अभिमान असतानाच तो यापुढे दिसणार नाही याचे दुःख होत असून प्रत्येकाच्याच डोळ्यात असावे दाटू लागली आहेत.