गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या वतीने 18 वे मराठी बालसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या बालाहित्याने सीमाभागातील संमेलनाच्या सोहळ्याला सुरुवात होणार असून यापुढे आता साहित्य संमेलनाची मांदियाळी रसिकांना पहावयास मिळणार आहे.
पु. ल. देशपांडे साहित्य नगरीत येथे हे संमेलन होणार आहे. संमेलनच्या सुरुवातीचा नारळ फुटला आणि साऱ्यांनाच आता संमेलनांचे वेध लागले आहेत.
या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सी वाय पाटील, संमेलन उदघाटन निवृत्त बँक कर्मचारी अध्यक्ष आपाजी कुलकर्णी हे असणार आहेत. तर बक्षीस वितरण समारंभाला मुंबई च्या अनुराधा गंगोली या राहणार आहेत.
शनिवारी सकाळी 9.30 वाजता या संमेलनाला सुरुवात होणार असून 2 पर्यंत हे संमेलन चालणार आहे. गोगटे रंगमंदिर कॅम्प येते हे संमेलन होणार आहे. या संमेलनाला उपस्थित राहावे, अशी मागणी अध्यक्ष जयंत नार्वेकर, चिटणीस सुभाष ओउळकर यांनी केले आहे.