शेतकऱ्यांना कर्जे देऊन त्यांना कोलकाता कोर्टातून अटक वारंट बजावलेल्या अक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी जिल्हाधिकारी बी एस बोमनहळळी आणि पोलीस अधीक्षक सुधीरकुमार रेड्डी यांनी केली आहे.
बुधवारी सकाळी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बँक अधिकारी शेतकरी प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत डी सी आणि एस पी यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला आहे. मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांनी कोलकाता कोर्टाने शेतकऱ्यांना अटक वारंट बजावल्या नंतर बेळगावच्या जिल्हाधिकारी बी एस बोमनहळळी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून अहवाल मागवला होता आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता त्या नंतर डी सी ऑफिस मध्ये ही बैठक आयोजली होती.
बैलहोंगल अक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांनी 700 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीसा बजवल्या आहेत बँकेने शेतकऱ्यांना चक्रवाढ व्याज लावले असल्यामूळ देखील जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.