बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप्प जलाशयात बुडून वडगावचा युवकाचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.प्रशांत महादेव शिवानाचे वय 24 रा. पाटील गल्ली वडगांव असे बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत हा आपल्या मित्रा सोबत मंगळवारी सकाळी राकसकोप्प जलाशयात फिरायला गेला होता त्याच्या सोबत आणखी दहा जण गेले होते जलाशयात अंघोळी करायला उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेहाचा तपास करत रात्री जिल्हा इस्पितळात शव चिकित्सा करण्यात आली.ग्रामीण पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने पाटील गल्ली वडगांव येथील शिवानाचे कुटुंबीयांवर शोक कळा पसरली आहे